लक्षणे

Home / लक्षणे

मानसिक आजार कसे ओळखल ?

आपण आता काही महत्वपूर्ण मानसिक आजारांबाबत [लक्षणे] थोडक्यात जाणून घेऊ जसे –
१. नैराश्य / उदासीनता व इतर भावस्थिती संबंधित आजार
२. स्किझोफ्रेनिया
३. OCD व इतर टेंशनचे विकार
४. Somtoform आजार [मानसिक आजार ज्यांचा थेट संबंध ह्रदय / श्वसनक्रिया / त्वचा / सांधे / अन्ननलिका
यांच्याशी असतो .]
५. विविध व्यसने जसे दारू, गांजा, झोपेच्या, गोळ्या, सिगारेट इ.
६. लहान मुलांमध्ये आढळून येणारे मानसिक आजार
७. वृद्ध व्यक्तींमध्ये आढळून येणारे मानसिक आजार
८. इतर मानसिक आजार [ जसे झोप / भूक / शारीरिक संबंध / डोके दुखी संबंधित ]

३-४ दिवसां पूरते टेंशन येणे व त्यामुळे झोप, भूक विस्कळीत होणे हे स्वाभाविक आहे. परंतु एखादया टेंशनमुळे (किंवा विनाकारण) खालील काही लक्षणे जर तुम्हाला २-३ आठवड्याहून अधिक कालावधीसाठी जाणवत असतील, तर तुम्हाला नैराश्य आजार असण्याची दाट शक्त्यता आहे.

 • मन नाराज /उदास असणे.
 • दैनंदिन जीवनातील नेहमीच्या गोष्टींमध्ये मन न लागणे.
 • झोप विस्कळीत होणे (कमी होणे किंवा वाढणे. )
 • भूक विस्कळीत होणे (कमी होणे किंवा वाढणे. )
 • चिडचिड होणे अथवा नेहमीच्या तुलनेत स्वमग्न अथवा प्रमाणहून अधिक शांत होणे.
 • थकवा, आलास जाणवणे
 • एकाग्रता कमी होणे, विसरभोळेपणा जाणवणे
 • निर्णयक्षमता कमी होणे
 • नकारात्मक विचार वाढणे – स्वतःबद्दल, भविष्याबद्दल व आजूबाजूच्या व्यक्ती/वातावरणाबद्दल
 • जीवनाचा कंटाळा येणे.
 • कुठेतरी निघून जावे / काहीतरी करून घ्यावे / आत्महत्येचे विचार मनात येणे.

भावस्थिती निगडीत दुसरा आजार म्हणजे Bipolar Mood Disorder (व्दिधृवीय) ज्यामध्ये व्यक्तीला कधी नैराश्याची लक्षणे दिसतात कधी उन्माद (Mania) ची काही लक्षणे दिसतात.

उन्मादची काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत :-

 •  अति उत्साह मनस्थिती
 • अति प्रमाणात बोलत राहणे, बोलण्यात वारंवार विषयांतर होणे.
 • अति उच्चविचार – स्वतःबद्दल / क्षमतेबद्दल उदा. माझ्याकडे खूप पैसे आहे, मी अमुक अमुक सामाजिक कार्य करू इच्छितो, मी अमुक अमुक उच्च पदस्थ व्यक्तीला ओळखतो, मी स्वतःअमुक उच्चपदस्थ व्यक्ती / देव आहे. इत्यादी.
 • खुप कमी झोपणे अथवा झोपेची गरज न भासणे.
 • अति खर्चिक वृत्ती
 • बोलण्यात / वागण्यात प्रमाणाहून अधिक धार्मिकता दिसून येते.
 • एखादी क्रिया गरज नसताना वारंवार करत राहणे.

एखादया व्यक्तीच्या वागणुकीतील / विचारांमधील आढळून येणारे बदल (अचानक पाने उद्भवलेले अथवा ठराविक कालावधीत हळूहळू वाढत जाणारे) जर खाली दिलेल्या काही लक्षणांमध्ये बसत असतील, तर डॉक्टरांना त्वरीत भेटावे. –

 • व्यर्थ बडबड
 • चिडचिड, अति प्रमाणात राग, तोडफोड [क्षुल्लक कारणांवरून]
 • विनाकारण संशय [घरातील / ओळखीतील किंवा अज्ञात व्यक्ती विरुद्ध]
 • विनाकारण भिती
 • एकटयात स्वतःशी हसणे अथवा पुटपुटणे, [बोलणे]
 • विविध प्रकारचे भास होणे / कानात आवाज येणे.
 • विक्षीप्त वागणूक जसे कचरा जमा करणे, विनाकारण भटकणे.
 • प्रमाणाहून अधिक शांत होणे, कुणाशी संवाद ना साधने.
 • स्वतःच्या दुनियेत रमणे , स्वतःची काळजी न घेणे.

लोकसंख्येतील अधिक प्रमाणात आढळून येणारे हे आजार सुमारे १८% व्यक्तींमध्ये दिसून येतात. या सर्व आजारांमध्ये एक लक्षण प्रामुख्याने आढळून येते. आणि ते म्हणजे प्रमाणाहून अधिक भिती , बेचैनी [ एखादी वस्तु , विचार, प्रसंग व ईतर गोष्टी विषयीची ] वाटणे त्यापैकी काही आजारांची लक्षणे प्रमाणे आहेत.

 • OCD

एखादा असा विचार जो आपल्या मनाविरुद्ध आपल्या डोक्यात वारंवार / अधिक प्रमाणात येतो; तो विचार आपल्याला न आवडणारा, घाण, विक्षीप्त आणि कितीही प्रयत्न करूनही डोक्यातून न जाणारा असतो. असल्या विचाराने व्यक्ती प्रमाणाहून अधिक बेचैन होते व त्यामुळे त्याचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. काही व्यक्ती असले विचार टाळण्यासाठी एखादी क्रिया वारंवार करताना दिसतात. [उदा. किटाणू, घाण व त्याबाबतीतल्या स्वच्छतेचा विचार व ते टाळण्यासाठी वारंवार हात धुणे, अंघोळ करणे ]

 • Social Anxiety Disorder

कुठल्या एखाद्या सामाजिक परिस्थितीत प्रमाणाहून अधिक भिती वाटणे व ती टाळण्याचा प्रयत्न करणे.

( जसे अनोळखी व्यक्तींना भेटणे / भाषण देणे / बाहेर जेवणाचा प्रसंग इत्यादी सामाजिक परिस्थिती )

 • Specific Phobia

एखाद्या विशिष्ट परिस्थीती अथवा वस्तूची प्रमाणाहून अधिक भिती व ती टाळण्याचा प्रयत्न.

( जसे – काही प्राणी / ऊंची / पाणी / रक्त बघणे / इंजेक्शन घेणे इत्यादी यातील एखादी परिस्थिती )

 • Panic Disorder

अचानक काही कारण नसताना २-३ मिनीटासाठी हृदयाचा झटका आल्यासारखी लक्षणे जाणविणे आणि ते पण हृदयाचा कुठल्याही प्रकारचा आजार नसताना. लक्षणे – छातीत धडधडणे, श्वास कोंडणे, कापरं होणे, घाम येणे, चक्कर येऊन पडतो कि काय किंवा वेड लागते कि काय असे वाटणे इत्यादी)

 • Agoraphobia

खाली दिलेल्या ठिकाणांपैकी एकाहून अधिक परिस्थितीत वाटणारी भिती व ती टाळण्याचा प्रयत्न करणे किंवा साबेत कुणीतरी एका व्यक्तीची गरज भासणे. १) बंद ठिकाणे जसे लिफ्ट, थिएटर इ. २) प्रवासी वाहने जसे बस, रेल्वे, विमान इ. ३) एकटे घराबाहेर पडणे.

 • Generalized Anxiety Disorder

प्रत्येक छोट्या मोट्या सामान्य परिस्थितीमध्ये अत्यंत बेचैन होणे, स्नायूमध्ये तणाव जाणविणे, शरीराची

चलबिचल होणे, सहज थकवा येणे, मन एकाग्र न होणे इत्यादी लक्षणे जाणविणे

मानसिक तणाव व शारीरिक आजार यातील संबंध ह्या आजारांत दिसून येतो. मानसिक तणावामुळे काही शारीरिक आजारांची लागण होते अथवा असलेल्या आजारांमध्ये वाढ होते. उदा. त्वचेचे विकार, दमा, संधीवात ह्या आजारांत वाढ होणे किंवा उच रक्तदाब सारख्या आजारांची सुरुवात.

विविध व्यसनांची लागण जसे दारू, गांजा, भांग, अफू, झोपेच्या गोळ्या इ.

अभ्यासात मागे पडणे, अतिचंचलता, मन एकाग्र न होणे, स्वमग्रता इ.

अती विसरभोळेपणा, स्वभावातील बदल, विनाकारण चिडचिड चव संशयी वृत्ती, झोप न लागणे नैराश्य, भीती इ.

जसे – झोप न येणे अथवा जास्त येणे – नेहमीची डोकेदूखी – कुठलाही आजार नसताना वारंवार रक्त चाचण्या करणे व आजार असल्याची सततची जाणीव – व्यक्तिमत्व दोष – शारीरिक संबंधातील अडचणी इ.