ओळख

Home / ओळख

ओळख

मानसिक आरोग्य व आजाराविषयी काही महत्वाच्या गोष्टी :
१. मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय?
२. जनमाणसात ह्याविषयी माहिती / जागरूकता का असावी ?
३. मानसिक आजार कसा ओळखाल ?

मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळया बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटूंब, व्यवसाय आणि समाजातील लोकांशी चांगले नाते असणे व त्यासंबंधीत आवश्यक ती जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडणे. दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस १९९२ पासून “जागतिक मानसिक आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी एक ब्रीदवाक्य घेऊन मानसिक आरोग्य व आजार या विषयी जागरूकता करणे हा त्यामागचा उद्देश असतो. मागील दोन वर्षांची ब्रीदवाक्य – २०१७ – “Mental Health in the Workplace” म्हणजे व्यवसाय व कामाच्या ठिकाणी असलेले मानसिक स्वास्थ्य . कारण असल्या ठिकाणी दार ५ व्यक्तिमध्ये १ व्यक्ति मानसिक आजाराने त्रस्त होतो, असे आढळून आले आहे. २०१८ – “Young People and Mental health in a changing world” म्हणजे बदलत्या विश्वात तरुण व त्यांचे मानसिक आरोग्य. कारण अर्ध्याहून अधिक मानसिक आजारांची सुरुवात हि वयाच्या १४ व्या वर्षी होते. तरुणांनां मानसिकरीत्या सक्षम ठेवण्याची गरज ओळखून हे ब्रीदवाक्य होते.

त्याची प्रमुख ४ कारणे आहेत आणि ती अशी- अ) मानसिक आजारांचे अती प्रमाण :- भारतात अंदाजे २० कोटी मानसिक आजारांची रुग्ण आहेत. (म्हणजे अंदाजे दार १००० व्यक्तीमागे २०० मानसिक रुग्ण आहेत. मानसिक आजार म्हणजे

फक्त ‘वेड लागणे’ एवढेच नसून त्यात नैराश्य, झोपेचे आजार, विविध व्यसने इत्यादी अनेक आजार येतात. ब) मानसिक आजारांविषयी अती प्रमाणात गैरसमज – मानसिक आजरार का होतात ? त्याची कारणे काय ? त्यासाठी योग्य तो उपचार कुणाकडून घ्यावा याविषयी व उपचारादरम्यान गोळ्या – औषधी विषयी खुप गैरसमज आहेत. यामुळे मानसिक रुग्ण एकतर उपचारापासून दुरावतो किंवा योग्य तो उपचार घेत नाही. उदा. अजूनही बहुतांश लोकांना वाटते कि, मानसिक आजार हे जास्त टेंशन घेतल्याने / विचार केल्याने / कुणीतरी “बाहेरंच” केल्याने / भूतबाधा, जादू टोण्याने होतात. हे पूर्णपणे चूकीचे आहे. याविषयी अधिक माहिती FAQ / समज – गैरसमज या पेज / लिंकवर आहे. क) योग्य तो उपचार न घेणे किंवा त्यास अतिविलम्ब करणे. मानसिक आजारांचे उपचार त्वरित व पूर्ण कालावधीसाठी घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सामान्य आयुष्य जगू शकतो. मानसिक आजारांसंबंधी योग्य ते मार्गदर्शन झाल्यास / माहिती मिळाल्यास बऱ्याच रुग्णांना खुप फायदा होऊ शकतो.

या विषयीची सविस्तर माहिती “आजारांची लक्षणे” या पेज / लिंकवर आहे. परंतु थोडक्यात सांगायचे झाल्यास खाली दिलेल्या लक्षणांपैकी कुठलाही स्वभावातील / व्यक्तीतील बदल अधिक प्रमाणात किंवा अधिक कालावधीसाठी जाणवल्यास, सल्ला घेणे आवश्यक आहे.

 • नैराश्य, उदासीनता जाणविने
 • कामात मन न रामणे.
 • झोप न लागणे किंवा अती प्रमाणात येणे.
 • भूक न लागणे किंवा अती प्रमाणात लागणे.
 • छोट्या – छोट्या गोष्टीवर चिडचिड होणे.
 • प्रमाणाहून अधिक नकारात्मक विचार येणे.
 • चिडचिड, शिवीगाळ किंवा मारहाण करणे.
 • इतरांशी संवाद अचानक पणे कमी किंवा बंद करणे
 • नेहमीची डोके दुखी
 • विनाकारण संशयी वृत्ती
 • एकट्यात पुटपुटणे / हसणे / हातवारे करणे.
 • कुठल्याही विशिष्ट गोष्टीची प्रमाणाहून अधिक भिती उदा. प्रवास, उंची, शारीरिक आजार इ.
 • विसरभोळेपणा
 • आत्महत्येचे विचार
 • व्यसनाधिनता
 • कुठलाही आजार नसतानां वारंवार तपासणी करणे व विविध डॉक्टरांना भेटणे इत्यादी