समज-गैरसमज

Home / समज-गैरसमज

Myths & FAQs about psychiatry

मानसिक आजार का होतो ? याविषयी अनेक गैरसमज आहेत. आणि ह्या गैरसमजूतीच्या कारणाने बहुतांश रुग्ण उपचारांपासून दुरावतात. जास्त टेंशन घेतल्याने किंवा कुणीतरी काहीतरी “बाहेरचं” वा भूत – बाधा केल्याने मानसिक आजार होतात, हि केवळ गैरसमजूत आहे. कुठलाही शारीरिक आजार जसे मलेरिया, टायफॉईड काही तरी जैविक कारणाने (शरीरातील बदल) होतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे मानसिक आजार हे जैविक कारणानेच होतात. आणि म्हणूनच त्यांना योग्य तो उपचार दिल्यास इतर शारीरिक आजारांप्रमाणे ते देखील १००% बरे होतात.

शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो. अमुक एखाद्या व्यक्तिचा स्वभाव, चिडचिडकिंवा विचार जास्त करण्याची वृत्ती अशा लोकानाच जास्त होतो हा गैरसमज आहे.

होय, बहुतांश मानसिक आजारांमध्ये कमी – अधिक प्रमाणात अनुवांशिकता ही आढळून येते.

आपल्या समाजात हा खुप मोठा गैरसमज आहे की, ज्या व्यक्तीला अक्षरशः वेड लागले आहे फक्त त्यांनाच मानसोपचार तज्ञाकडे उपचारासाठी नेले जाते. विनाकारण स्वतःशी पुटपुटणे / हसणे / हातवारे करणे ही फक्त एका मानसिक आजाराची (स्किझोफ्रेनिया) लक्षणे आहेत. अशी तब्बल १०० हून अधिक मानसिक आजार आहेत ज्यात प्रामुख्याने नैराश्य, भीती, झोपेचे आजार, डोकेदुखी, स्वभावातील अचानक बदल, विविध व्यसने, अभ्यासात मागे पडणे व इतर लहान मुलांचे आजार, विसरभोळेपणा व

इतर वृद्ध व्यक्तीमध्ये आढळणारे आजार, शारीरिक संबंधात अडचणी असे इतर अनेक मानसिक आजारांचे प्रकार आहेत.

अक्षरशः काही रुग्ण ५ ते १० वर्षानंतर उपचारासाठी आणली जातात. एकतर त्यांच्या नातेवाईकांना हा आजाराचा भाग आहे हेच माहित नसते किंवा “होईल स्वतःहून बरा” म्हणून दुर्लक्ष केलेले असते. प्रत्येक मानसिक आजारांची लक्षणे आपल्या सामाजात माहित असल्यास रुग्णांची विनाकारण हाल होणार नाही. symptoms (लक्षणे) या पेजवर विविध मानसिक आजारांची थोडक्यात लक्षणे दिलेली आहेत.

होय, अचूक निदान व त्वरित योग्य उपचार केल्यास हे आजार पूर्णपणे बरे होण्यास मदत होते. म्हणून लक्षणे दिसून आल्यास वेळ न घालवता मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेणे खुप गरजेचे आहे.

बरेच रुग्ण वर्षो नुवर्षे अशा डॉक्टरांकडून उपचार घेत असतात जे मानसोपचार तज्ञ नाहीत. त्यात रुग्ण व नातेवाईक दोघांचेही खुप नुकसान होते. म्हणून उपचार मानसोचार तज्ञ यांच्याकडूनच घ्यावेत. नातेवाईक किंवा गावातील व्यक्तींचे ऐकून बाबा, बुवा, भागात यांच्याकडून उपचार घेणे हे चुकीचे आहे. योग्य त्या उपचारास विलंब झाल्यास आजार पूर्णपणे बरा करणे कठीण असते. म्हणून आपल्या विश्वासातील फॅमिली डॉक्टरकडून उपचार योग्य ठिकाणी चालू आहे की नाही ? याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे.

प्रत्येक आजार मग तो शारीरिक असो की मानसिक, उपचार किती कालावधीसाठी घ्यावा, हे ठरलेले असते. उदा. थंडी – ताप : ३ दिवस, टाईफॉईड : १५ दिवस, टी.बी. : २ ते ५ वर्षे, डायबेटीज : आयुष्यभर. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, मानसिक आजारांवरील उपचार पूर्ण कालावधीसीठी न घेतल्यास आजार पुन्हा परतण्याची शक्यता खुप जास्त असते आणि त्यानुसार कालावधी देखील वाढतो. उदा. स्किझोफ्रेनिया (पहिली वेळ) १ ते २ वर्षे, स्किझोफ्रेनिया (दुसरी वेळ) ३ ते ५ वर्षे या प्रमाणे.

नाही. मनात काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांना विचारावे. कुणाच्या सांगण्यावरून उपचार बंद करू नये. तसे केल्याने नक्कीच रुग्णाचे नुकसान होईल.

नाही, ह्या गोळ्या आपल्या मेंदूवर काम करीत असतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अचानक गोळ्या बंद करू नये, तसे केल्याने त्रास होऊ शकतो.